Sun. Jun 20th, 2021

डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून जनजागृती

अहमदनगर: देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन खाटा न मिळाल्याने शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

सरकार आणि पर्यावरण प्रेमी वृक्ष लावण्याबाबत नेहमी आवाहन करत असतात.कोरोना महामारीच्या काळात सर्वच वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जिवाची बाजी लावून सुविधा देत आहेत. अहमदनगर तालुक्यातील वाळकी गावातील डॉक्टर दांपत्याने प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेला संदेश सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

अहमदनगरमधील संजीवनी रुग्णालयातील डॉ. युवराज कासार आणि डॉ. कोमल कासार यांनी आपल्या प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे. ‘आजारातून बरा झाल्यानंतर एक झाड लावा. म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही’, असा संदेश त्यांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिला आहे.

‘प्रत्येक रूग्णासाठी प्रिस्क्रिप्शनवर हाताने संदेश लिहिण्यासाठी वेळ जात होता, त्यामुळे आता या डॉक्टरांनी तसा स्टॅम्प बनवून घेतला आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *