Sun. Sep 19th, 2021

पश्चिम बंगालमधील संप चिघळला, 700 डॉक्टरांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये डाॅक्टरांवर झालेल्या  हल्ल्यानंतर देशभरात डॉक्टरांचा संप चांगलाच चिघळलाय. ठिकठिकाणी रुग्णालये आणि मेडिकल काॅलेजेस बंद ठेवत या हल्याचा डाॅक्टरांकडून विरोध केला जात आहे. शिवाय ममता बॅनर्जी यांनी आमच्याकडे चर्चेला यावं, बिनशर्त माफी मागावी असा पवित्रा घेत मारहाणीच्या ऩिषेधार्थ आतापर्यंत 700 डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

700 डॉक्टरांचा राजीनामा

पश्चिम बंगाल मधील कोलकात्याच्या NRS  मेडिकल कॉलेजमध्य़े एका वृद्धाच्या मृत्यूला डाॅक्टरांच्या निष्काळजीपणाचे कारण देत डाॅक्टरांना बेदम मारण्यात आले.

डाॅक्टरांच्या या मारहाणीवर देशभरातीैल वैद्यकीय क्षेत्रात संपाच्या रूपाने याचे पडसाद उमटत असून केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेऊन रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत.

पश्चिम बंगालमधील संपाचे हे लोण देशभरात पोहोचलं आणि देशभरातील डाॅक्टर आंदोलन करत पाठींबा दर्शवत आहेत.

पश्चिम बंगालमधील हा संप दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेत ममता बॅनर्जी सरकारने मात्रसंपकरी डाॅक्टरांना चर्चेसाठी बोलावलेआहे.

परंतु,  ममता बॅनर्जी यांनी आमच्याकडे चर्चेला यावं, बिनशर्त माफी मागावी असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.

दरम्यान निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं ममता बॅनर्जींना संपावर तोडगा काढण्यासाठी 48 तासाचा अल्टीमेटम दिला आहे.

दूसरीकडे केंद्र सरकारने या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारकडून रिपोर्ट मागीतला आहे. आतापर्यंत मारहाणीच्या ऩिषेधार्थ 700 डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *