Fri. Jan 28th, 2022

अल्पसंख्याक समाजाला नेस्तनाबूत करताय का? – आशीष शेलार

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुडांना मोठ्या पदावर बसवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच नोटाबंदीच्या काळात फडणवीसांनी बनावट नोटांचा खेळ सुरू केल्याचा दावा मलिकांनी केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात कोणतेही गैरव्यवहार झाले नाहीत असे आशीष शेलार यांनी सांगितले आहे. गुन्हेगारांना राजाश्रय धंदा तुमचाच आहे तसेच अल्पसंख्यांक समाजाला नेस्तनाबूत करत आहेत का? असा सवाल आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

  फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळले असून आज त्यांनी काही खुलासे केले आहेत.  देवेंद्र  फडणवीस यांचे मुन्ना यादवसोबत काय संबंध आहे असा सवाल मलिकांनी उपस्थित केला. त्यावर आशीष शेलारांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुन्ना यादव आणि हैदर आझम हे भाजपाचेच कार्यकर्ते असल्याचे आशीष शेलारांनी सांगितले. रियाज भाटी यांचे पंतप्रधानांसोबत संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे संबंध रियाज भाटीसोबत असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले.

  नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असून मलिकांचे नीच पातळीवर राजकारण सुरू असल्याचे शेलार यांनी सांगितले. मलिकांमुळेच आर्यन खान, शाहरुख खान अडचणीत आले आहेत. सरदार खान १९९३ पासून तुरुगांत होते तर तुरुगांत असलेल्या आरोपीचे जमीन व्यवहारात नाव कसे काय? तसेच सरकारकडे जाणारी मालमत्ता ही मलिकांकडे कशी काय? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *