Jaimaharashtra news

‘मलिकांना रोज प्रसिद्धी हवी आहे का?’ – उच्च न्यायालय

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान नवाब मलिकांना खडा सवाल केला आहे. नवाब मलिकांनी आक्षेपाबाबत तक्रार का केली नाही? कागदपत्र ट्विट करुन ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? मलिकांना रोज प्रसिद्धी हवी आहे? जातप्रमाणपत्राबद्दल आक्षेप होता तर मलिकांनी त्याविषयी तक्रार का केली नाही? असे प्रश्न उच्च न्यायालयाने मलिकांना विचारले आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिकांना, ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही विधान अथवा ट्विट न करण्याची हमी उच्च न्यायालयात द्यावी लागली आहे.

Exit mobile version