Fri. Jan 28th, 2022

‘ड्रग्जचा खेळ हा गुजरातमधून चालतो का?’; मलिकांचा पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्यात अनेक राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच गुजरातमधील द्वारका येथे ३५० कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरातमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यावरून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

  गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्ज सापडल्यामुळे ड्रग्जचा खेळ हा गुजरातमधून चालतो का? असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक म्हणाले, मुंबईत काही ग्रॅम ड्रग्ज सापडले की बॉलिवूड कलाकारांची परेड काढली जाते. आता गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ३५० कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. हे ड्रग्ज समुद्री मार्गाने आणले जात आहे का? तसेच कोणत्या पक्षाचा, कुठल्या नेत्याचा याप्रकरणामध्ये संबंध आहे हे न पाहता एनसीबी आणि एनआयएने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मलिकांनी केली आहे.

 मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सुनील पाटील हे गुजरातमधील नोव्हेलॅट हॉटेलमध्ये राहत होते. तसेच त्यांचे गुजरात सरकार मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत आणि हेच लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची शंका मलिकांनी उपस्थित केली. त्यामुळे ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतो का? असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *