Sat. Jul 31st, 2021

श्वानांच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी ; तोडले शरीराचे लचके

मुंबईत मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे परिसरातील लोकांना अतोनात हाल सहन करावे लागतात. तसेच कुत्र्यांंनी हल्ला केल्याच्या अनेक घटना सतत घडत आहेत.

दरम्यान नुकतीच विरारच्या अर्नाळा बीचवर २० ते २५ मोकाट कुत्र्यांनी ११ वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कुत्र्यांनी अक्षरशः मुलाच्या पूर्ण शरीराचे लचके तोडले आहेत.

यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विरारच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निरवाद मेहर असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास अर्नाळा बीचवर ही घटना घडली आहे.

मुलगा आपल्या आई सोबत दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी जात होता. पण मुलगा पुढे पळत जात होता. मुलाला पळताना पाहून डम्पिंग ग्राउंडवर असणाऱ्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या शरीराचे लचके तोडले.

तात्काळ स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यावर मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडून दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *