Wed. Jan 19th, 2022

डोंबिवलीत एका दिवसांत 25000 बटाटे वडे तळण्याचा विश्वविक्रम

डोंबिवली जिमखान्यात (Dombivli Gymkhana) सुरू असलेल्या ‘उत्सव’ महोत्सवात (Utsav) एकाच दिवसात 25000 बटाटे वडे (Batata vada) तळण्याचा विश्वविक्रम (World Record) डोंबिवलीकर शेफ सत्येंद्र जोग यांनी केला आहे. यासाठी सत्येंद्र जोग (Satyendra Jog) यांनी सकाळी 10 ते रात्री 11.30 असे सलग साडे 13 तास अखंड बटाटेवडे तळले. ‘लिम्क बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये (Limca Book of World Records) यासाठी त्यांचं नाव नोंदवलं जाणार आहे.

यासाठी जोग यांना तब्बल 1500 किलो बटाटे, 500 किलो तेल आणि 500 किलो बेसन लागलं.

शिवाय 100 जणांची टीम यासाठी मेहनत घेत होती.

यावेळी जोग यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

जोग यांनी तळलेले हे बटाटेवडे आदिवासी पाडे, विटभट्ट्या यांवर नेऊन सामाजिक संस्थांनी वाटले.

बटाटावडा हा मुंबईकरांचा आवडता खाद्यपदार्थ असून त्याला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा विक्रम केल्याचं शेफ सत्येंद्र जोग यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *