Mon. Apr 6th, 2020

अहोरात्र सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना पाठवल्या डोंबिवलीच्या भगिनींनी राख्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘माझ्या भाऊराया…रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी तुझ्या हाती बांधते राखी, देवाकडे करते प्रार्थना तुझ्या कुटुंबाना मिळू दे नेहमी परमेश्वराची साथ’ असा संदेश देणारे कार्ड आणि राख्या सैनिकांना पाठवण्यात आले आहेत.

 

देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना डोंबिवलीतील काही महिलांनी पोस्टाद्वारे राख्या पाठविल्या आहेत. सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करत असतात त्यामुळे त्यांना राखी बंधने महत्वाचे आहे.

 

मात्र, आम्हाला तेथे नागरिकांना पोहोचणे शकत नसल्यानं राख्या पाठविल्याचे समाजसेविका काशीबाई जाधव यांनी सांगितलं. सुमारे 400 राख्या पाठवण्यात आल्या आहेत. तसंच या राख्या सैनिकांपर्यत पोहोचणार असं समजल्यावर दुकानदारांनी काही राख्या मोफत दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *