Fri. Sep 30th, 2022

#Artical 370 ; डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव मोदींनी फेटाळला

जी-7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या पत्रकार परिषदेत काश्मिरप्रश्नी चर्चा करण्यात आली आहे.

जी-7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या पत्रकार परिषदेत काश्मिरप्रश्नी चर्चा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या काश्मिर प्रश्नी मध्यस्थी करु या विधानाबाबतहूी या पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात आली आहे.

जी -7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत काश्मीरप्रश्नांवर चर्चा करण्यात आअली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी नरेंद्र मोदींनी मदत मागितल्याचे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते यावरही आज चर्चा करण्यात आली आहे.

फ्रांसच्या बिआरीत्झ शहरात आजपासून जी-7 शिखर परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांदरम्यान काश्मीर मुद्यावरही चर्चा झाली. यावेळी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात नाकारला.

काश्मीर प्रश्न दोन्ही देशामधील द्विपक्षीय मुद्दा असल्याने तिसऱ्या देशाला त्रास देण्याची आमची इच्छा नाही असं मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट केलं. त्यामुळे हा मुद्यावर चर्चेद्वारे तोडगा काढल्या जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. यापुर्वी ट्र्म्प यांनी भारत-पाककडून काश्मीरवर तोडगा काढण्याचा प्रस्ताव आल्याच विधान केलं होत.

या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा गौरव केला. काश्मीरची परिस्थिती आटोक्यात असल्याचं मोदी यांनी आपल्याला सांगीतल्याचं डोनाल्ड़ ट्रंम्प यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.