डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आर्थिक दणका!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्यापारात अमेरिकेकडून भारताला मिळणारे विशेष प्राधान्य समाप्त करायचे आहे. ट्रम्प यांनी तस जाहीर केलं आहे.

भारताला मिळालेला लाभार्थीचा दर्जा अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमातर्गत समाप्त करण्याच्या दिशेने ट्रम्प यांनी पाऊल उचलले आहे.

भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ५.६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कुठलाही कर लावला जाणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

जगात भारत अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमाचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी एक धक्का आहे.

काय आहे जीएसपी दर्जा ?

अमेरिकेमध्ये जीएसपी अंतर्गत भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती.

भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या 5.6 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कुठलाही कर लावला जात नाही.

भारत हा अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी होता.

ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती.

यानुसार 1970 पासून भारताला 40 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासाठी झटका का?

अमेरिकी उत्पादनांवर भारतात  मोठया प्रमाणात कर आकारला जात असल्याचे त्यांनी अनेकवेऴा सांगितले आहे.

अमेरिकेच्या उत्पादनांवरील करा संदर्भात भारत सरकारबरोबर बरीच चर्चा झाली.

अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समन्यायी वागणूक देण्याबाबत भारताकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.

त्यामुळे आपण हे पाऊल उचलत आहोत असे ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टर्कीचाही दर्जा समाप्त?

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताप्रमाणे टर्कीचाही जीएसपी कार्यक्रमातर्गत लाभार्थीचा दर्जा समाप्त करायचा आहे.

टर्कीच्या अर्थव्यवस्थेत मागच्या चार दशकात बरीच सुधारणा झाल्याने असा निर्णय घेण्यात येत आहे असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

भारताला जीएसपीतून बाहेर काढण्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर दोन महिन्यांनी अंमलबजावणी सुरु होईल.

भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना मिळणारी कर सवलत बंद होणार आहे.

 

Exit mobile version