Fri. Oct 7th, 2022

ट्रम्प म्हणतात… भारताचा आयात कर अमेरिकेला जाचक

भारताने अमेरिकेतील वस्तूंवर १०० टक्के कर लादला आहे. हे कर आपल्याला मान्य नाहीत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करावा असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे.

भारताने अमेरिकेतील वस्तूंवर १०० टक्के कर लादला आहे. हा जगातील सर्वात जास्त कर लादणारा देश आहे. हे कर आपल्याला मान्य नाहीत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करावा असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. जी २० परिषदेत आमची या विषयावर सकारात्मक चर्चा होईल असं ही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

भारताचे कर अमेरिकेला जाचक

भारताने हार्ले डेव्हिडसन या मोटारसायकलसह अनेक अमेरिकी वस्तूंवर 100 ते 120 टक्के आयात शुल्क लावले आहे.

आमच्या 28 वस्तूंवर भारताने 100% कर लादला असून तो कर जाचक आहे असं ट्रम्प यांच म्हणणं आहे.

हे कर आम्हाला मान्य नाहीत असं ही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरविचार करायला हवा असा सल्ला ही त्यांनी मोदींना दिला आहे.

२० परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे.

यामध्ये याविषयावर चर्चा केली जाईल असं ही ट्रम्प यांच म्हणण आहे.

भारत हा जगातील सर्वात जास्त कर लादणारा देश आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.