भारत दौऱ्याआधी ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सोमवारी भारत दौऱ्यावर येत आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
तसेच सर्व भारतीय ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ट्रम्प हे बाहुबलीच्या भुमिकेत पाहायला मिळत आहेत.
भारतातील मित्रांना भेटायला मी फार उत्सुक आहे, अशी कॅप्शन डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला दिली आहे.
ट्रंप सोमवारी 24 फेब्रुवारीला अहमदाबाद येथे पोहचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच स्वागत करतील.
यानंतर एअरपोर्टपासून ते मोटेरा स्टेडिअम पर्यंत ट्रम्प यांचा रोड शो काढण्यात येणार आहे.
ते गुजरातमधील मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन करणार आहे. मोटेरा स्टेडिअम हे जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असणार आहे.
या उद्घाटनानंतर नमस्कार ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प हे ताजमहाल या वास्तूची भेट घेणार आहेत.