Sat. Jul 31st, 2021

गाढविणीच्या दुधाने कोरोना होतो बरा, बिहारच्या नेत्याचा जावईशोध

कोरोनावर उपचार शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करत आहेत. याचवेळी अनेकजण मात्र गोमुत्र किंवा अनेक अशास्त्रीय उपाय सांगत उपचाराचे दावे करत आहेत. यातच बिहारच्या ‘जन अधिकार पार्टी’चे अध्यक्ष पप्पू यादव यांनी नवा उपाय  सुचवला आहे. दररोज २ चमचे गाढविणीचं दूध प्यायल्याने कोरोना बरा होतो असा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.  

काय आहे पप्पू यादव यांनी सुचवलेला उपाय?-

कोरोनावर आपल्याकडे रामबाण उपाय असल्याचं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे.

गाढविणीचं दूध प्यायल्याने कोरोना गाढवाच्या डोक्यावरच्या शिंगाप्रमाणे कोरोना गायब होईल, असा पप्पू यादव यांचा दावा आहे.

२ दिवस, २ चमचे गाढविणीचं दूध दिवसांतून २ वेळा प्यायल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो.

हा कोरोना पळवण्याचा रामबाण इलाज आहे.

याचबरोबर पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. १ ते ५ एप्रिलच्या भानगडीत का पडत आहात? 23 मे २०१४ पासून प्रत्येक दिवस हा १ एप्रिलच आहे, अशं म्हणत ते जनतेला मूर्खच बनवत आहेत, असं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप मोठे ठग आहेत, अशी टीकाही यादव यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *