Sat. Sep 21st, 2019

मित्रांनी सामन्याचे तिकीट मागू नये; TVवर मॅच बघा – विराट

0Shares

World Cup 2019 सुरू असून आज सर्वात महत्वाचा सामना इंग्लंडच्या मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी सगळेच प्रचंड उत्सुक आहेत. हा सामना बघण्यासाठी अनेक जण इंग्लंडला तिकीट काढून जातात. मात्र कर्णधार विराट कोहली आपल्या मित्रांसाठी तिकीट किंवा पासेस देत नसल्याचे म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाला विराट कोहली ?

आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे.

इंग्लंडमधील मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड येथे हा सामना पार पडणार आहे.

तु कोणाला पास किंवा तिकीट काढून देण्यात मदत करतोस का ? असा प्रश्न कर्णधार विराट कोहलीला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.

माझ्या मित्रांनी जर माझ्याकडे तिकीट किंवा पास मागितले तर मी त्यांनी घरी बसून सामना टीव्ही बघावा असा सल्ला दिला आहे.

एकाला पास किंवा तिकीट दिले तर इतरांनाही द्यावे लागते.

तसेच जितके पास किंवा तिकीट मिळातात ते कुटुंबियांसाठी असतात, असे विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *