Wed. Oct 27th, 2021

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका – राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या काही मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत रंगशारदा सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला राज ठाकरे अवघे १० मिनीटंच उपस्थित राहिले. प्रकृती स्थिर नसल्याने राज ठाकरे लवकरच बैठकीतून निघून गेले, असे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत शॅडो कॅबिनेट या आणि यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार होती. परंतु बैठक सुरु झाल्यानंतरच्या १० मिनिटानंतर राज ठाकरे निघून गेले.

एनआरसी आणि एनपीआरच्या समर्थनार्थ मनसे ९ फ्रेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. याबाबतची माहिती राज ठाकरे यांनी २३ तारखेला झालेल्या अधिवेशनात दिली.

या मोर्च्यासंदर्भात राज ठाकरेंनी ही बैठक घेतली होती.

राज ठाकरेंनी २३ जानेवारीच्या अधिवेशनात हिंदुत्वाची भूमिका घेतली. यानंतर सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना हिंदुह्रदयसम्राट म्हणून म्हटलं जातं होतं.

यामुळे राज ठाकरेंनी या बैठकीत मला हिंदुह्दयसम्राट म्हणून नका, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान सभेतून निघण्याआधी राज ठाकरेंनी ९ फेब्रुवारीच्या मोर्च्याची जबाबदारी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *