Mon. Oct 25th, 2021

“दहशतवाद्यांना पोसू नका” – डोनाल्ड ट्रम्प

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे एका सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले. जैश – ए – मोहम्मदने हा हल्ला केल्याचे समोर आले होते. या हल्ल्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि चीनला सल्ला दिला आहे. ‘दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदत करण्याचे बंद करा’, असा सल्ला यांनी यावेळी दिला आहे.

अमेरिकेचा सल्ला काय ?

पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि चीनला मोठा आणि महत्वाचा सल्ला दिला.

दहशतवाद्यांना पोसू नका.

तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत करू नका.

UNOच्या आपल्या देशाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण पाडा.

दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका आणि मदतही करू नका असा सल्ला UNO च्या सर्व देशांना ट्रम्प यांनी दिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला ही सर्वात मोठी भयानक घटना असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *