त्यांना नका नेऊ, ते जिवंत आहेत; पतीच्या मृतदेहाशी आजींनी मारल्या गप्पा

मुंबईतील भोईवाडा परिसरातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर एका वृद्ध महिलेच्या बाजूला असलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा मृतदेह वृद्ध महिलेच्या पतीचा होता. मृतदेह बाहेर काढताना, ते जिवंत असून माझ्याशी गप्पा मारतात आणि त्यांना घेऊन जाऊ नका असं वृद्ध महिला वारंवार बोलत होती. आपला पती जिवंत नसल्याचे वृद्ध महिलेने स्विकारले नसल्यामुळे वृद्ध महिला गप्पा मारत असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं ?
मुंबईतील बीडीडी चाळीतील घरातून दुर्गंधी येत असल्याने तसेच काही दिवासांपासून घरातून कोणीही बाहेर पडले नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला.
त्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घरात शिरताच दुर्गंधी आली आणि आजीच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
मृतदेहाला बाहेर काढताच, ते जिवंत असून माझ्याशी गप्पा मारतात आणि त्यांना घेऊन जाऊ नका असं आजी म्हणाली.
आजींची समजूत काढत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.