Tue. Oct 26th, 2021

बटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया

अनेकजण फळ खाल्ल्यानंतर फळांच्या साली फेकुन देतात. मात्र, याच फळांच्या साली या फार फायदेशीर ठरतात. या सालींमुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहु शकतो. तुम्ही बटाट्याच्या आणि केळ्याच्या साली फेकुन देत असाल तर असं करू नका. या साल आरोग्यासाठी फार फायदेशीर असून बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच लोह हे भरपूर प्रमाणात असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. तसेच वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर बटाट्याची साल फायदेशीर आहे. बटाट्यात मोठ्या प्रमाणात फायबर घटक असल्यानं आपली पचनशक्ती देखील चांगली राहते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील नाहीशी होते. बटाट्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते. म्हणून बटाटा हा बहुमुल्य आहे. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्यानं, त्याच्या सेवनाने हाडं मजबुत हे होतात. बटाट्यात व्हिटामिन ‘बी’ असते. व्हिटामिन ‘बी’मुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा. केळीची देखील आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. केळीची साल जर आपण बंद डोळे करून डोळ्यावर ठेवली तर डोळ्या खालील काळे डाग जातात. तसेच केळाची साल जर शरीरवर येणाऱ्या मोसवर रोज चोळली तर मोस ही नाहीशी होते. केळीच्या सालीचा आहारात समावेश केल्यास अनेक फायदे होतात. केळीच्या सालला स्वच्छ धुवून दहा मिनिटे गॅसवर पाण्यात चांगले उकळा आणि नंतर हे पाणी प्या. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच आपण केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून देखील आहारात वापरू शकतो. केळीच्या सालीचे पावडर पाण्यात मिक्स करून रोज सकाळी पिल्यास वजन कमी होते.यामुळे केळीच्या सालचा आहारात समावेश केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *