Fri. Jun 21st, 2019

तरुणावर अ‍ॅसिड हल्ला आणि गोळीबार, एका हल्लेखोराची आत्महत्या!

27Shares

पुण्यामध्ये सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अ‍ॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक घटना 16 एप्रिलच्या रात्री घडली आहे. रोहित विजय थोरात असे या तरुणाचे नाव आहे. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर गुन्हेगाराच्या साथीदाराने त्याच्यावर गोळीबारही केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

रोहितची याची आई ज्योतिष विशारद आहे.

रोहित स्वतः ‘law’चा विद्यार्थी आहे.

त्याच्या आईने एका तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती.

त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

रोहित हा टिळक रोडवरील बादशाही लॉजलगतच्या बोळात रात्री मैत्रिणी समवेत बोलत थांबला होता.

यावेळी दोघे जण तेथे आले.

त्यांच्यातील एकाने रोहितच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला.


 

आरोपीचीही आत्महत्या!

त्यानंतर त्याच्या साथीदाराने त्याच्या दिशेने गोळीबार केला व तो स्वप्नगंध अपार्टमेंटमध्ये पळाला.

दरम्यान आरोपी ज्या अपार्टमेंटमध्ये शिरला तेथे त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

अग्निशमन दलांच्या जवानांनी रात्री उशीरा दुसऱ्या आरोपीला तिथून पकडून बाहेर काढलं.

या सर्व प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

27Shares

Leave a Reply

%d bloggers like this: