Thu. Dec 2nd, 2021

शिवसेनेला धक्का : अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचा ‘राष्ट्रवादीमध्ये’ प्रवेश

छत्रपती संभाजी राजे या मालिकेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ओळखला जाणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादीमध्ये  प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे.

अमोल कोल्हेंच्या या निर्णयामुळं शिवसेनेला जबरदस्त धक्का बसणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळामध्ये होत आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते सध्या (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते.

ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.

शिवसेनेचे शिवधनुष्य सोडून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांची राजकिय कारकिर्द

डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्यामधील नारायणगाव येथे झाला.तिथेच त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.

पुढे त्यांनी आपटे प्रशालेतून सायन्समधून 12वी पर्यंतचे तर  मुंबईच्या गोवर्धनदास सुंदरदास महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

डॉ.अमोल कोल्हे पुढे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या मालिकेपासून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

सध्या झी मराठी वाहिनीवर सुरु असणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये ते संभाजी महाराजांची भूमिका ते साकारत आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते सध्या (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते.

ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.

शिवसेनेचे शिवधनुष्य सोडून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, या नेत्यांच्या उपस्थितीत आज त्यांंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अमोल कोल्हे हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघांतून राष्ट्रवादीतर्फे निवडणुक लढवू शकतात.

तसेच त्यांच्यासोबत आणखी दोन माजी आमदारांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे शरद पवार यांची अमोल कोल्हेंसोबत त्यांच्या निवासस्थानीच भेट झाली होती.

संभाजी ब्रिगेडचे नेते आणि प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते.या दोघांच्या  भेटीने राजकीय वर्तृळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं.

त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण डॉ अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याने  शिवसेनेला मात्र जबरदस्त हादरा धक्का बसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *