Tue. Sep 17th, 2019

निवडणुकीतील यशानंतर डॉ. अमोल कोल्हे आशीर्वाद घ्यायला ‘किल्ले शिवनेरी’वर!

0Shares

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांना घवघवयीत यश मिळवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली.

निवडणूक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार असे अनेक प्रश्न विचारले जात होते.

आज विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर डॉ कोल्हेंनी येऊन मोठी घोषणा केली.

शिरुर लोकसभा मतदारसंघाची शिवभूमी म्हणून एक वेगळी ओळख असल्याने या शिवभूमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल.

या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपूर्ण देशात असेल, असंही यावेळी डॉ अमोल कोल्हेंनी सांगितलं.

अमोल कोल्हेंकडून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार

अमोल कोल्हे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत मुख्य भुमिका साकारतात.

शिरुर लोकसभा मतदार संघातून डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं.

विजयाच्या दुसऱ्याच दिवशी किल्ले शिवनेरीवर जाऊन राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन शिवजन्मोत्सवाची घोषणा खासदार डॉ कोल्हे यांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *