Mon. Sep 27th, 2021

महान असे कलाम…

असेे होतेे भारताचेे मिसायल मॅन….

कोमल वावरकर, जय महाराष्ट्र, मुंबई : अब्दुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम यांनी भारताच्या प्रगतीसाठी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि उत्कृष्ट कामगिरींमुळे आजही ते भारतीयांच्या स्मरणात आहेत.

त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे भारताला एक जगात वेगळी औळख मिळाली यामुळेचं कलाम हे युवा पिढीलासाठी प्रेरणाचे स्थान बनले आहेत. त्यांना भारताचा मिसायल मॅन असं म्हटलं जातं.
कारण त्यांच्यामुळे भारताचे उपग्रह अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वीरित्या अवकाशात स्ठापित होऊ शकले. यासाठी डॉ. कलामचे जगभरातून कौतुक झाले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म तामीळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावात १५ ऑक्टोबर १९३१ साली झाला होता. कलाम यांना लहापणापासूनचं समुद्रजवळील पक्षी उडतांना बघायला आवडत होते. त्यांचा जन्म मच्छीमार कुटुंबात झाला होता. मात्र कलाम हे अंत्यत संवेदनशील होते.

त्यांनी कमी वयात त्यांच्या वडिलांचे गमावलं होते. मात्र त्यांच्या वडीलांनी नेहमीचं असं वाट होतं की कलाम यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहीजे यासाठी ते कलाम नेहमी सहकार्य करत होते. वडीलांच्या निधनानंतर त्यांनी वर्तमानपत्र विकून आणि छोटीमोठी काम करून याद्वारे घरच्यांची मदत केली .

कलाम यांचे बालपणा फार कष्टात गेले मात्र त्यांची हिंम्मत कधीच खचली नाही. स्वताचे स्वप्न कसे पूर्ण होईल याचाचं कलाम सतत विचार करत असत.त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात झाले.
शाळेत त्यांना गणित विषयाची फार आवड होता. त्यांना गणित या विषयात गुण उत्तम मिळत असतं. त्यानंतर त्यांनी रामेश्वर पासून दूर समुद्रालगत असणार रामनाथपुरम स्च्वार्त्ज़ मैट्रिकुलेशन या शाळेत दाखला घेतला. तिथे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी तीरुचीरापल्ली येथील सेंट जोसेफ्स या महाविद्यालमधून भौतिकशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली.

1954 ते 1957 या कालावधी दरम्यान मद्रास इन्सिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)मधून एरोनॉटिलक इंजिनिरींगमध्ये डिप्लोमा पुर्ण केला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेकनॉलॉजीचं प्रशिक्षण घेतलं.
त्यांनी 1963 रोजी भारतीय अवकाश संशोधन (इस्त्रो) क्षेपणास्त्र पिएसएलव्ही सेटेलाइट लॉन्चिंग व्हईकलच्या संशोधनात भाग घेऊन त्यावर काम करू लागले. त्यांनी संशोधनात त्यांचा खूप वेळ दिला.

डॉ.कलाम यांनी डीआरडीमध्ये त्यांच्या सहकाजाणाऱ्यासोबत उत्तम काम केलं. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी काय सोयस्कर असणार यावर कलाम सतत विचार करत असतं. अग्नी’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या अवकाशात स्ठापित झाली.
यामुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झालं. त्यांनी देशाच्या सुरक्षितेसाठी अनेक धोरणे आखली.

कलाम यांनी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केलं होतं. त्यांनी 1974 रोजी भारताद्वारे पहिला परमाणु चाचणी भाग घेतला तर 1998 रोजी पोखरण येथे परमाणु चाचणी केली आणि त्यात यश आलं.
कलाम यांनी डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

2002 रोजी त्यांनी लक्ष्मी सहगल यांना मागे टाकत कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले. कलाम राष्ट्रध्यक्ष झाल्यानंतर देखील भारतासाठी अनेक संशोधनात भाग घेत होते.
कलाम यांना भारत सरकारद्वारा पद्यभूषण, पद्यविभूषण आणि 1997 भारतरत्न हा किताब देऊन त्यांना सन्मानित केलं होतं.

कलाम यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधला फार आवडत असतं कारण त्यांना भारताच्या भविष्याची चिंता होती. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली.
त्यांना शिलाँग येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. कलाम यांनी अखेरच्या श्वासपर्यत काम केलं. विद्यार्थ्यांना संबोधित करतांनाचं त्यांनी जग सोडलं. त्यांनी भारतासाठी केलेलं कार्य हे सदैव भारतीयांच्या स्मराणात राहणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *