डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर चबुतऱ्याची उंची ही १०० फूट इतकीच राहणार आहे.

याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्तावित पुतळा ३५० फुटावरुन ४५० फुटांचा केला जाणार आहे. तसेच या पुतळयाचे काम २ वर्षात पूर्ण करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

शशी प्रभू हे या स्मारकाचे वास्तूविशारद म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

या पुतळ्याच्या बांधकामासाठीच्या सर्व परवानग्या देण्यात येणार आहेत. या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले.

२१ जानेवारीला अजित पवार इंदू मिलला भेट देणार आहेत.

स्मारकात चवदार तळ्याची प्रतिकृती उभारणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. तसेच या स्मारकामध्ये संग्रहालय आणि प्रदर्शन भरवण्याची सोय असेल.

तसेच स्मारकामध्ये ४०० बसू शकतील अशा ध्यानगृहची सोय केली जाणार आहे. तसेच पेक्षागृह देखील असणार आहे.

मुंबईतील इंदू मिलमधील १२५ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे.

आघाडी सरकारकडून 2011 साली या स्मारकाची घोषणा करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये या स्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले होते.

Exit mobile version