Thu. Sep 16th, 2021

गोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती

गोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहेत. विदेशात पिकणाऱ्या ड्रँगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी  केला आहे. परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते. त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यावसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर  यांनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या १० एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रँगन फळ. थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ठाकूर यांनी ड्रँगन फळाची यशस्वी शेती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *