Tue. Oct 19th, 2021

चीनचा ‘ड्रॅगन मॅन’ शोधल्याचा दावा

शास्त्रज्ञांनी शुक्रवारी मानवजातीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ईशान्य चीनच्या हार्बिनमध्ये वैज्ञानिकांना ‘ड्रॅगन मॅन’ची कवटी सापडली असल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांना सापडलेली कवटी ही नवीन प्रजातीची असू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. वैज्ञानिकांनी त्याचे नाव ‘ड्रॅगन मॅन’ असे ठेवले आहे.

ड्रॅगन मॅन म्हणून ओळखली जाणारी ही मानवाची प्रजाती १ लाख ४६ हजार वर्षांपूर्वी पूर्व आशियामध्ये राहत होती. हेलॉन्जियांग प्रांतात सोनगहुआ नदीवर पूल बांधत असताना एका कामगाराला १९३० मध्ये ही कवटी सापडली होती. परंतु जपानी सैन्यापासून बचाव करण्यासाठी कवटी विहिरीत लपवली गेली. ८५ वर्ष ही कवटी विहिरीतच होती.

‘ड्रॅगन मॅन’ कसा दिसतो ?

  • ड्रॅगन मॅनची कवटी मानवाच्या सामान्य खोपडीपेक्षा थोडी मोठी आहे
  • प्राचीन आणि आधुनिक प्रकारच्या मनुष्यांचे मिश्रण आहे
  • त्यातील मेंदूची जागा सामान्य मानवाच्या डोक्या इतकीच असते
  • डोळ्यातील खड्डेही सामान्यपेक्षा किंचित मोठे आहेत
  • डोळ्याचा भागही जवळजवळ चौरस
  • तोंड आणि दात मोठे असावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *