देशातील परिस्थिती पाहून राखी सावंतच्या डोळ्यात पाणी ?

राज्यासह देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात आंदोलन केली जात आहे. काही ठिकाणी शातंतेत तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण लागलं.
प्रत्येक क्षेत्रातून या कायद्याचा विरोध करण्यात आला. या कायद्याविरोधात अनेक सेलिब्रिटींनीदेखील रस्त्यावर विरोध केला.
याच पार्श्वभूमीवर ड्रामाक्वीन राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून राखीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच राखीने या व्हिडिओत रडताना जनतेला आवाहन केलं आहे.
काय म्हणाली राखी ?
ही भांडणं कोण लावत आहे, हे माहिती नाही. हिंदू-मुस्लीमांमध्ये भांडणं लावली जात आहेत. एकमेकांविरोधात भांडू नका, आपण सर्व एक आहोत, हिंदूस्तान आपला आहे.
आपल्या सर्वांना एक दिवस मरायचंच आहे. अशा प्रकारे राखी सावंतने रडत रडत जनतेला आवाहन केले आहे.