Wed. Nov 13th, 2019

आता गोव्याच्या बीचवर दारु पिताना दहावेळा विचार करा नाही तर…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गोव्याच्या बीचवर दारु पिताना आता दहावेळा विचार करावा लागणार आहे. कारण गोव्याच्या बीचवर दारु पिताना दिसल्यास तुरुंगात खडी फोडायला लागू शकते.

 

गोव्यातल्या भाजप सरकारनंच तसा आदेश काढला आहे. बीचवर दारु पिताना आढळल्यास दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल असे सरकारनं

विधीमंडळात सांगितले.

 

राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी काँग्रेस आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सरकार काळजी घेत आहे.

 

दारु पिणाऱ्यांनाही रोखत आहेत. वेळप्रसंगी दारु पिणाऱ्यांना अटकही करु अशी माहिती त्यांनी दिली. पण, गोवा सरकारच्या या निर्णयाने बीचवर जाऊन दारु पिणाऱ्यांची

मात्र निराशा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *