(व्हिडीओ) सावधान ! रस्त्यावरील ज्यूस पित असाल तर पाहा ‘हा’ व्हिडीओ

पावसाळा सुरू असून रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. नालासोपारा येथील पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी वापरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असताना गाजाराचे ज्यूस पायाने बनवत असल्याचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
नालासोपारा येथील पाणीपुरीच्या स्टॉलवर शौचालयाचे पाणी वापरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असताना एक व्यक्ती पायाने गाजाराला धुवत असल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यामध्ये एक व्यक्ती गाजाराने भरलेल्या ड्रममध्ये पाय टाकून गाजर धुवत असल्याचे दिसत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.
मुंबईत अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो.