Wed. Oct 27th, 2021

मुंबईत पहिल्यांदाच ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र

मुंबई: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ मंगळवारपासून सुरू केले आहे. दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू केलेल्या या केंद्रामध्ये दररोज पाच हजार लोकांचे लसीकरण होऊ शकणार आहे.

या केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. लसीकरणासाठी रांगा लागत असल्याने ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांची गैरसोय होते,तर घरोघरी जाऊन लसीकरणाची मुभा सरकारने दिलेली नाही. त्याषमुळे ड्राइव्ह इन लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

कोहिनूर वाहनतळावर एकूण दोन बूथ आहेत. तेथे लस घेण्याणसाठी येणाऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर वाहनात बसूनच त्यांनना नोंदणीही करता येते. वाहनात थांबूनच त्यां ना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण करता येतो. लस घेण्यातसाठी बूथपासून किमान ५० वाहने एकाचवेळी रांगेत थांबू शकतील आणि निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत किमान १०० वाहने एकाचवेळी थांबू शकतील इतकी जागा येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *