Thu. Jun 17th, 2021

कोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना काळात कुणाचं कुठे जात नाही आहे. कोरोना संकटामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शिवाय कोरोनाच्या संसर्ग हा झपाट्याने वाढत आहे. आता याचं ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (RC) संबंधित काही कामं करायची असतील, तर आपणास कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसणार कारण नव्या शासन नियमानुसार, आता ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून या अंतर्गत आपण नोंदणी प्रमाणपत्र (RC) 60 दिवस अगोदर नूतनीकरण करू शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे आणि नूतनीकरण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहे. याअंतर्गत कोरोना काळात अशा कामांसाठी लोकांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. बहुतेक काम डिजिटल पद्धतीने केले जातील. आपणास लर्निंग लायसन्स मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागते. कोरोना काळात परिवहन मंत्रालयाने यातून दिलासा दिला आहे. तसेच आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची अत्यावश्यकता दूर केली आहे. आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्युटोरियलद्वारे घरी बसूनच त्यांना यासाठी मदत मिळू शकेल. ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC), फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी सारखी मोटार वाहन कागदपत्रे ज्या वाहनचालकांची 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली, त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिलासा मिळाला आहे. सरकारने त्यांची वैधता मर्यादा 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत कालबाह्य कागदपत्रे जूनपर्यंत वैध मानली जातील. वाहन चालकांना कोणतेही चालान भरावे लागणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *