Tue. Sep 29th, 2020

मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर, पीकं करपल्याने शेतकरी हवालदिल!

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. नदी,नाले, तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. मात्र मराठवाडयातील जिल्हे अजून कोरडेच आहे. पावसाने पाठ फिरवल्याने उभ पीक डोळ्यादेखत जळून चालले आहे. जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

भर पावसाळ्यात जिल्ह्यांत टँकर आणि चारा छावण्या सुरु आहेत. बीड जिल्ह्यातील लहान-मोठे 144 प्रकल्प अजून मृत साठ्यात आहेत. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी नसल्याने चिंता व्यक्त केली जातेय. खरीप पिकांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.

अनेक शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन तूर मूग, उडीद ही पिके करपून गेल्याने कुटुंब जागवायचं कसं हा शेतकऱ्यांपुढचा खुप मोठा प्रश्न आहे. ‘डोळ्यादेखत पिकं जळतायत, ते पाहवत नाही’ ‘इथे राहून काय करावं?’ असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

गेल्या 4 वर्षांत सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. शेतीत पेरणीसाठी खर्च केला, पण हातात काहीच पडलं नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नच गंभीर आहे. कोरडी आश्वसनं नको तर ठोस उपाय योजना करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *