खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले – जलसंधारण मंत्री

रत्नागिरीतील चिपळून तालुक्यातले तिवरे धरण फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या धरणफुटीत 18 मृतदेह हाती लागले असून अद्याप 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी हा धरण बांधला असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे खेकड्यांनी भोकं पाडल्याने भगदाड पडल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

काय म्हणाले जलसंधारण मंत्री ?

तिवरे धरण फुटल्याने 18 मृतदेह हाती लागले असून 5 जण अद्याप बेपत्ता असल्याचे समजते आहे.

खेकड्यांनी भोकं पाडल्याने भगदाड पडलं आणि त्यामुळे तिवरे धरण फुटलं असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

तिवरे धरण नैसर्गिक आपत्तीमुळे फुटलं आणि या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात.

अधिकाऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी बातचीत केल्यानंतर धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असल्याचे समजते आहे.

धरण खेकड्यांच्या पोखरल्याने फुटले असल्यामुळे गुन्हा कोणावर दाखल करायचा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जलसंधारण मंत्र्यांनी असा प्रश्न केल्यामुळे महाराष्ट्राची जनता संत्पत झाल्याचे समजते आहे.

 

 

 

Exit mobile version