Jaimaharashtra news

Corona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर

कोरोना हा व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगूनही सुद्धा अनेक लोक कुत्र्यांना तसेच पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास तयार नाहीत. असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. याच गोष्टींचा परिणाम लक्षात घेता अमरावतीमध्ये ‘युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉप’ चे संचालक समीर जनवंजाळ यांनी ‘आपले प्राणी बाहेर रस्त्यावर किंवा जंगलात न सोडता आम्हला दत्तक द्या, आम्ही त्यांना पोसतो’ असं आवाहन केलं आहे

प्राण्यांना पोसणं, सांभाळणं फार खार्चिक गोष्ट आहे. प्राण्यांना अनेक आजार होत आसतात, असं सांगितलं जातं. त्यातच आता Corona Virus चं संकट आलंय. त्यामुळे अनेकजण तातडीनं या सर्व पाळीव प्राण्यांना जंगलात किंवा इतर ठिकाणी सोडत आहेत. त्यामुळे हे पाळीव प्राणीसुद्धा बेघर होत आहेत. ‘या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर ना सोडता मला दत्तक द्या असे आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपच्या संचालक समीर जनवंजाळने केलं आहे.

कुणा व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आल्यास, त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. याचं मूळ Corona Virus आहे. त्यामुळे अनेक जण आता आपले पाळीव प्राणी समीर जनवंजाळकडे विश्वासाने आणून देत आहेत.

सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची अफवा उठवल्याने काही लोकांनी घरातील पाळीव प्राण्यांना बाहेर काढलं आहे. अशात अमरावतीमध्ये ‘युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉप’चे संचालक समीर जनवंजाळ यांनी उचललेलं पाऊल अत्यंत प्रेरणादायी असून त्याच कौतुक करावे तेवढं कमीच आहे.

Exit mobile version