Wed. Oct 5th, 2022

भिंत कोसळून पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू…

जय महाराष्ट्र न्यूज, विदर्भ

गेल्या 12 तासापासून विदर्भात मुसळधार कोसळणा-या पावसामुळे भंडारा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 

भंडारा तालुक्यातील राजेदहे गावात पावसामुळे घराचे छत कोसळले आणि छताखाली दबून एकाच परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

मृत्यू पावलेल्यांमध्ये 32 वर्षीय शेतमजूर सुखरू दामोदर खंडाते, त्यांची 28 वर्षीय पत्नी सारिका खंडाते आणि अवघ्या 3 वर्षांची चिमुकली सुकन्या यांचा समावेश आहे. 

 या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून जिल्ह्यात अद्याप तब्बल 113.8 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे तर येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भंडारा जिल्यात पावसाची सततधार सुरु असुन वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मीटर उघडण्यात आले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.