Fri. Sep 24th, 2021

‘या’ कारणामुळे पाकचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमी सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. मात्र यंदा ट्रोल होण्याचे कारण सुद्धा   हास्यस्पद असल्याने नेटीझन्स ट्विटरवर चांगलेच ट्रोल करत आहेत. इम्रान खान सध्या इराण दौऱ्यावर असून त्यांनी अध्यक्ष हसन रुहानी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी जपान आणि जर्मनीने एकमेकांची लाखो माणसं मारली. मात्र दोघांमधील संबंध चांगली नसतानाही फक्त उद्योगासाठी संबंध मजबूत केले असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना नेटीझन्स ट्रोल करत असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं ?

पाकचे पंतप्रधान इम्रान खान इराण दौऱ्यावर असताना अध्यक्ष हसन रुहानी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जपान आणि जर्मनीची लाखो माणसं मारल्या गेली असताना फक्त उद्योगासाठी दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत केले असल्याचे म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी जर्मनी आणि जपान बॉर्डर शेअर करत असल्याचे म्हटलं असल्यामुळे त्यांना इतिहास आणि भूगोल माहिती नसल्याचे नेटीझन्स म्हणाले आहे.

जपान हा पूर्व आशियात असून जर्मनी युरोपात आहे.

मात्र त्यांना जपान नसून फ्रान्स असं म्हणायचं असेल असेही नेटीझन्सनी कमेंट केले आहे.

त्यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत इम्रान खान यांना ट्रोल केले आहे.

थॅंक गॉड, हे सद्गगृहस्थ इतिहास किंवा भुगोलाचे शिक्षक नाहीत असे ट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *