Jaimaharashtra news

धक्कादायक ! स्ट्रेचर अभावी रुग्णाची फरफट

एकीकडे निवासी डॉक्टरांनी संप पुकारला असून दुसरीकडे रुग्णांचे हाल होत आहेत. नागपूरमध्ये रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णाला चक्क फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं ?

नागपुरात रुग्णाची अवस्था बिकट असतानाही नातेवाईकांना रुग्णाला फरफटत घेऊन जाण्याची वेळ आली.

निवासी डॉक्टारांनी पुकारलेल्या संपामुळे एकही डॉक्टर रुग्णांना तपासण्यासाठी आलेेला नसल्याचे समजते आहे.

नागपूरमध्ये राहणारे रतन रामटेके यांना मानसिक आजर झाला आहे.

रामटेके यांची प्रकृती खालवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रादेशिक मनोरुग्णालयात त्यांना घेऊन गेल्यावर ते बेशुद्ध झाले.

त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

मात्र रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे नातेवाईकांनाच फरफटत घेऊन जाण्यात आले.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

 

 

Exit mobile version