Thu. Jan 27th, 2022

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, 11 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात घडल्याची घटना घडली आहे. डंपरने मिनीडोअर रिक्षाला मागून धडक दिली आहे. या अपघातामध्ये एकूण ११ जणं जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर – महाडच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

या धडकेत मिनीडोअर रस्त्याजवळ असलेल्या गटारात जाऊन पडली. यामुळे मिनीडोअर चालकासह ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

या ११ जणांपैकी २ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या गंभीर असलेल्या दोघांना माणगाव येथे पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित ९ जणांना महाडच्या रानडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. मात्र नंतर त्याला पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *