Wed. May 19th, 2021

कॉंग्रेसच्या काळात 6 वेळा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले – राजीव शुक्ला

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कॉंग्रेसच्या काळात सरकारने 6 वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना सर्जिकल स्ट्राइकचा कधीच गाजावाजा केला नाही असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले राजीव शुक्ला ?

कॉंग्रेसच्या काळात यूपीए सरकारने 6 वेळा सर्जिकल स्ट्राइक केले आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना या गोष्टींचा गाजावाजा केला नाही.

मात्र आताचे सरकार सर्जिकल स्ट्राइकचा गाजावाजा करत फिरत असल्याचा टोला राजीव शुक्ला यांनी लगावला आहे.

कॉंग्रेसच्या 6 सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे केले ?

जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील भट्टल सेक्टरमध्ये १९ जून २००८मध्ये सर्वात प्रथम ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला.

2011 साली 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी केलमध्ये नीलम नदीच्या खोऱ्यात शारदा सेक्टरमध्ये केला.

६ जानेवारी २०१३मध्ये सावन पात्र चेकपोस्ट येथे तिसरा स्ट्राइक केला.

२७-२८ जुलै २०१३ साली नजापीर येथे चौथा करण्यात आला.

६ ऑगस्ट २०१३ ला पाचवा आणि १४ जानेवारी २०१४ला सहावा सर्जिकल स्ट्राइक केला.

ही सर्व माहिती कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *