Sat. Jul 2nd, 2022

पूर आला तेव्हा प्रशासन सक्रिय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काही दिवासांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर असून पूरपरिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत सुरू असलेल्या बचावकार्यसंदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्यामुळे सांगलीत येऊ शकलो नाही अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

31 दिवसांचा पाऊस 9 दिवसात पडला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

9 दिवसांत 50 TMC पाणी भरल्यामुळे कोयनेतून विसर्ग झाला.

कोल्हापूर जिल्ह्यात 480% पाऊस कोसळला आहे.

कोल्हापूरच्या शिरोळ भागात बचावकार्य वाढवावं लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सांगलीत 100 बोटी बचावकार्यात लावल्या आहेत.

सांगलीमध्ये 95 बोटीद्वारे बचावकार्य सुरू.

सांगलीत 100 गावांत 28,000 कुटुंबं विस्थापित झाली

ब्रम्हनाळच्या घटनेत 12 जण ठार झाले. 8 जण अजूनही बेपत्ता आहे.

2 लाखाच्या आसपास लोकांना सुरक्षित जागी हलवलंय.

पूर ओसरल्यानंतर परिस्थितीचा अंदाज येईल.

484 किलोमीटरचे रस्ते पुरामुळे खराब झाले आहेत

सर्व ट्रान्सफॉर्मर बदलवून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

400 ट्रान्सफॉर्मर बदलून घ्यावे लागणार आहेत.

सरकार आणि स्वयसेवी संस्था मदत करत आहेत

7 टन अन्नाचा पुरवठा सांगलीला एयर ड्रॉप मात्र अन्नाची हानी होत असल्यामुळे बोटीद्वारे अन्नधान्य पोहोचवण्याला प्राधान्य-

सांगली शहरात अरुंद गल्ल्यांमध्ये बोटी जाऊ शकत नाहीत.

तिथे एनडीआरएफचे जवान उतरून मदतकार्य करताहेत

सांगली आणि कोल्हापूरमधून आतापर्यंत 3 लाख 78 हजार लोकांना हलवलं.

360 छावण्यांत लोक हलवण्यात आले आहेत.

सरकारचा जीआर सुधारीत आहे.

मदत निधी तातडीनं वितरीत करण्यात येईल छावण्यांमध्ये विस्थापितांना भत्ता देणार

35 हजार जनावरांना सुरक्षित जागी हलवण्यात आलंय.

153 कोटी रुपये मदत रिलीज करण्यात आली आहे.

जनावरांच्या चारा छावण्यांसाठी भत्ता सुरु केलाय पुरात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख मदत.

जनावरांच्या मृत्यूसाठी 25 हजारांपर्यत मदत.

पाणी कमी झाल्यावर कोणतीही कमतरता भासू नये म्हणून तयारी केलीये.

पाणी कमी झाल्यावर कोणतीही कमतरता भासू नये म्हणून तयारी केलीये.

सफाईसाठी जास्त मशिनरी आणि कामगार लावण्याचे आदेश दिलेत

पीकं नष्ट झालेल्या ठिकाणी 38 हजारांपर्यंत मदत.

गहू, तांदूळ सरकारकडे उपलब्ध आहे पूर ओसरल्यानंतर अनेक गावांना नव्यानं उभं करावं लागणार आहे.

या कामासाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेणार

अलमट्टी संदर्भात कर्नाटक सरकार सोबत बोलणं सुरु

बँकांमध्ये लोकांची पासबुक्स नाहीत त्यामुळे काही मदत रोख देणार.

पासबूक नसलं तरी ओळख तपासून पैसै देण्याचे आदेश बँकाना दिलेत.

जनावरासांठी चाऱ्याची मदत करणार.

पुरात वाहून गेलेल्यांसाठी 5 लाख रुपये देणार

जखमीच्या उपचाराचा खर्च देणार

घर पडल्यांना एक लाख रुपयाची मदत

दूभत्या जवावरांसाठी 30 हजार रुपये मदत

गाय असणाऱ्यांना 25 हजार रुपये देणार.

मदतीसाठी अटी शिथील करण्याचा निर्णय

पूर ओसरल्यावर डॉक्टरांची टीम पाठवणार

सध्या सांगली, कोल्हापूरात 100 डॉक्टरांच्या टीम कार्यरत

औषधपुरवठा सुरळीत आहे

प्रत्येक गावात 1 डॉक्टर तैनात करणार

शेतीतला गाळ काढण्यासाठी हेक्टरी 13 हजारांची मदत

खरडून गेलेल्या शेतीसाठी एकरी 38 हजार रुपयाची मदत

निधीची कुठलीच कमतरता नाही

मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्राधान्य.

पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचा आढावा घेतला

जाईल त्यानंतर अतिरीक्त मदत निधी पुरवला जाईल

सिध्दीविनायक, पंढरपूर, महालक्ष्मी देवस्थान मदतीला तयार

विरोधी पक्षाने राजकारण करू नये, आपल्याला राजकारण करायला दुसरीकडे पुष्कळ जागा आहे.

आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. त्यांच्याही अडचणी आहेत

मात्र कर्नाटक सरकारने हळूहळू विसर्ग वाढवून 5 लाख 30 क्यूसेक केला आहे.

दोन्ही राज्य पूर्णपणे एकमेकांना मदत करत आहेत.

कर्नाटक सरकारने वेळोवेळी मदत केली.

प्रत्येक गावात एक डॉक्टर आणि दोन फार्मासिस्ट नेमणार.

शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टरी 13 हजार रुपयांची मदत.

गहू तांदूळ स्टॉक सरकारकडे आहे, अन्य मदत द्या, गावांच्या पुनर्विकासासाठी ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी सरकारसोबत यावं.

अलमट्टी धरणासंदर्भात कर्नाटकासोबत सासत्यानं संपर्कात.

आज आलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग.

एकाचवेळी पाणी सोडल्यास कर्नाटकातील 130 गावं पाण्यात जातील.

शेतीचं नुकसान, जमीन खरडून गेली असेल तर 38 हजार प्रती हेक्टर मदत, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था सुरु आहे.

आकस्मात निधीतून निधी देतोय, निधीची कमतरता नाही.

छोट्या गावात डॉक्टर असेल, सफाईला प्राधान्य असेल, महापालिकांची माणसं आणि मशिनरी उपलब्ध करुन स्वच्छता करावी लागेल.

केंद्र सरकारनं देशभरातील टीम्स राज्यात पाठवल्या.

छावण्यातील लोकांना भत्ता, जे छावणीमध्ये नाहीत त्यांनाही देऊ, पुरात वाहून गेलेल्यांना पूर्वी दीड लाख होतं आता 5 लाख.

सर्व पूरग्रस्तांना थेट रोकड स्वरुपात मदत देणं शक्य होणार नाही, काही लोकांना रोख देऊ, उर्वरीत बँक खात्यात देऊ.

गिरीश महाजनांना जाण्याचे आदेश मी दिले होते.

गिरीश महाजन अनेक ठिकाणी पोहोचलेत त्यांच्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.

कठिण होत अधिकारी कुठे चुकले त्याची चौकशी करणार त्यांच्यावर कारवाई करणार.

गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही.

उलट लोक जिथे पोहचू शकत नाहीत, तिथे गिरीश महाजन पोहोचले, त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला, सध्या लोकांना मदत करणे यालाच प्राधान्य आहे.

नदीच्या पाण्याची पातळी वेगाने कमी होत आहे.

72 तासात पाण्याची पातळी कमी होणार.

पूर आला तेव्हा प्रशासन सक्रिय होतं.

तीन दिवसातल्या पावसाचा अंदाज घेणं.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.