प्रतिकात्मक पुतळा दहन करताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टीला आग

कोल्हापूर : राहुल गांधीच्या त्या वक्तव्याचं देशभरातून निषेध केला जात आहे. कोल्हापुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हा सारा प्रकार काँग्रेस जिल्हा आणि शहर कमिटी कार्यालयाच्या बाहेर घडला.

राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं अभाविपकडून दहन करण्यात आलं. हा प्रतिकात्मक पुतळा जळत असताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टला आग लागली. विशाल शिराळकर असे या कार्यकर्त्यांच नाव आहे.

राहुल गांधीच्या पेटलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथ मारताना या कार्यकर्त्याच्या पॅन्टीने पेट घेतला. उपस्थित इतर कार्यकर्त्यांनी ही आग विझवण्याचं प्रयत्न केला. परंतु तेव्हा पर्यंत त्या कार्यकर्त्याने पॅँट काढल्याने पुढचा अनर्थ टळला. या घटनेमुळे कार्यकर्त्याच्या पायाला जखम झाली.

Exit mobile version