Tue. Mar 31st, 2020

पुण्यतिथी उत्सवात साईंच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान

पुण्यतिथी उत्सव काळातल्या 4 दिवसांत शिर्डीच्या साईबाबांना साईभक्तांनी सुमारे 5 कोटी 97 लाखांचे दान चढविले आहे. यात रोख रक्कम, सोने चांदी आणि वस्तु स्वरुपातील दानाचा समावेश आहे.
या वर्षीच्या चार दिवसांच्या पुण्यतिथी उत्सवात 1 कोटी 26 रूपांची देणगी साईबाबांच्या झोळीत जास्त प्राप्त झाली आहे. यामधूनही खास दान म्हणजे 21 देशातील भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून 24 लाख 55 हजार रुपयांचे विदेशी चलन बाबांना अर्पण केले आहे. 
या उत्सव काळात देशभरातून आलेल्या सुमारे तीन लाखहुन अधिक भाविकांनी साईबाबांचे समाधीचे दर्शन घेतले. भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज साई संस्थानकडून मोजणी करण्यात आली.
साई मंदिर परिसरातील दानपेटीत 2 कोटी 52 लाख 89 हजार 426 रुपये, तसेच साई मंदिरातील देणगी काउंटरवर 1 कोटी 46 लाख 50 हजार 336 रुपये भाविकांनी देणगी दिली.
एवढचं नव्हे जे भाविक शिर्डीत येऊ नाही शकले अश्या भाविकांनी डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी,चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे 1 कोटी 41 लाख 34 हजार 500 रुपये देणगी दिली, तसेच 900.940 ग्रॅम सोने अर्पण केले आणि 7114.800 ग्रॅम चांदीच्या वस्तू असे एकूण 2 लाख 17 हजार 945 रुपयांचे दान केले आहेत.
साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या दिवशी साई संस्थान कडून शिर्डीत घेतल्या जाणार भिक्षा झोळी कार्यक्रमात गहु, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, गुळ आणि खाद्य तेल तसेच रोख स्वोरूपात एकूण भिक्षा 3 लाख 60 हजार 78 रुपयांची भिक्षा गोळा झाली आहेत.
मागील वर्षी अर्थात 2017 रोजी चार दिवसांच्या साई पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी 4 कोटी 71 लाख रूपांचे दान अर्पण केले होते तर या 2018 वर्षीच्या चार दिवसाच्या पुण्यतिथी उत्सवात 5 कोटी 97 लाख रुपये अर्पण केले आहे. या वर्षीच्या देणगीत तब्ब्ल 1 कोटी 26 लाख रुपयाने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 
 
शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी दान करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षात साईबाबा संस्थानच्या दान पेटीत भक्तांनी भरभरुन दान केल्याने साईबाबांच्या गंगाजळातही घसघशीत वाढ झाल्याचे दिसुन आले आहे. सन 1920 साली सुरु झालेल्या साईबाबांच्या खात्यामध्ये 1600 रुपये होते तर आज साई संस्थानच्या विविध बँकामध्ये फिक्स डिपॉजिट 2000 कोटींची असून साई संस्थानकडे आज 431 किलो सोने आणि 500 किलो चांदी जमा आहे. हे सगळं त्या भक्तांचं देणं आहे जे आपल्या साईंना सगळं काही मानतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *