संप काळात यांत्रिकी कर्मचारी, वाहन परिक्षक चालक पदावर काम करणार

एसटी महामंळ राज्यशासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यभरात अनेक एसटी कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे एसटी बससेवा बंद झाली आहे. मात्र, काही ठिकाणी आता संपकारी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर काही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता संप काळात परिक्षकांना चालक-वाहक म्हणून काम करता येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
संप काळात यांत्रिकी कर्मचारी, वाहन परिक्षक, वाहतूक निरिक्षक, सहाय्य वाहतूक नियंत्रक यांना चालक-वाहक पदावर कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा चालक-वाहक पदावर काम करण्यासाठी प्रतिदिन ३०० रुरये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. परिक्षकांना २ ते ७ दिवसांचे प्रशिक्षण देऊन चालक-वाहक वाढवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तोंडी आदेश देऊन कर्मचाऱ्यांना चालक म्हणून काम करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने उघड केले आहे. त्यामुळे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरटीओकडून प्रवाशी वाहतुकीचा परवाना द्यावा लागणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात यांत्रिकी कर्मचारी, वाहन परिक्षक, वाहतूक निरीक्षकांना चालक पदावर तर सहाय्य वाहतूक नियंत्रक यांना वाहक पदावर कामासाठी वापरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एसटी बस रस्त्यावर धावू लागणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.