Sun. Oct 17th, 2021

महामार्गावर ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर गावठी मळाजवळ एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा शिरूर मधील घावटे मळा जवळ भरधाव ट्रकची रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला धडक बसली. हि धडक इतकी जोरात होती की बिबट्या हा उडून रस्त्याच्या दुभाजकावर आदळला.

दरम्यान त्या ठिकाणाहून जाणारे रिक्षाचालक यांनी पोलीस आणि वन विभागाला याबाबत कळवल्यानंतर वन विभाग घटनास्थळी हजर झाले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या या अपघातामध्ये मरण पावल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *