Mon. Jan 17th, 2022

Amazon देणार भारतीयांना 10 लाख नोकऱ्या

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणांवर ई-कॉमर्स कंपन्यांचे जाळे पसरले आहे. ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात आणि घरपोच सेवा दिली जाते.

आता घरपोच सेवा देणारी आघाडीची e-commerce कंपनी Amazon भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणार आहे.

माहिती-तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कंटेंट निर्मिती तसंच प्रत्यक्ष विक्री व्यवसाय, दळणवळण आणि वस्तू निर्मिती या माध्यमातून 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार असल्याची, याबाबची माहिती Amazon चे इन्कचे प्रमुख जेफ बेझोस यांनी दिली.

जेफ बेझोस यांनी नुकतीच 1 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या गुंतवणुकीचे रुपांतर रोजगारात होणार असल्याचं Amazon च्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

यापूर्वीही Amazonने गेल्या काही वर्षांमध्ये विविध माध्यमातून जवळपास 7 लाख लोकांना रोजगार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *