Thu. May 13th, 2021

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के!

संपूर्ण उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राजधानी नवी दिल्लीसह NCR परिसरात भूकंपाचे तीव्र झटके बसले. थेट काश्मीरपर्यंत हा धक्का जाणवला. या भूकंपामुळे लोकांनी घबराट पसरली आहे.

सायंकाळी 4.35 ला हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत.

6.1 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचं मापनातून पुढे आलंय.

दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, काश्मीर असा अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

लोकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अनेक लोक आपल्या घरातून, ऑफिसमधून बाहेर धावले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या रावळपिंडीजवळ असल्याचा सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *