पालघर परिसरात भूकंपाचे 6 धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात सकाळपासूनच एका मागोमाग एक असे सहा भूकंपाचे हादरे लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमध्ये सकाळपासून सहा भूकंपाचे लहान मोठे  धक्के बसले

दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी बसलेला भूकंपाचा हादरा हा आजपर्यंतच्या म्हणजे तीन महिन्यात सुरू असलेल्या हादऱ्यांपेक्षा सर्वांत जास्त तीव्रतेचा होता.

या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी असून या भूकंपाचा केंद्रबिंदू हा 20.0 n रेखांश 72.9 e असून पाच किलोमीटर खोलीवर होता.

पहिला धक्का सकाळी सात वाजता 3.1 रिश्टर स्केल असून दुसरा धक्का 10:03 वाजता बसलेला धक्का 3.5 रिश्टर स्केलचा होता.

गेल्या तीन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमधील धानिवरी, दापचरी, चींचले, बॉर्डी, कासा या भागात भूकंपाचे हादरे सुरू होते.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रात्री नागरिकांना घराबाहेर झोपावं लागतंय.

आज एकाच दिवशी एका मागोमाग एक असे सहा धक्के लागल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीती वाढली आहे.

हे धक्के बसत असताना शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी घरातून पळ काढला.

Exit mobile version