Tue. Oct 19th, 2021

इंडोनेशिया 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर आज 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसलाय. या वेगवान सुनामीने इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटामध्ये 384 लोकांचा बळी घेतला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. इंडोनेशियाच्या पालू आणि डोंगला या शहरांमध्ये भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. यापैकी बरेच घर जमीनदोस्त झाल्याची माहिती मिळतेय.

या भूकंपाचा केंद्रबिंदूपासून पालू शहर हे ८० किलोमीटर अंतरावर आहे. पालू शहरातील लोकसंख्या तीन लाख 50 हजार एवढी आहे. या शहराला 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.

या भूकंपानंतर देखील तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील असे इंडोनेशियातील प्रशासनाने म्हटले. नेमकं या त्सुनामीत किती जिवीतहानी झालीय हे अद्याप समजलेले नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *