भुकंपामुळे तुर्की आणि ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान
भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी…

तुर्की आणि ग्रीस या शहरांच्या किनारपट्टीवर शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कीतील इजमिर शहरामध्ये हा भूकंप झाला होता. भुकंपामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या शहरात अनेक मोठ्या इमारती कोसळल्या असून भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. ग्रीस मधील प्रसारमाध्यमातर्फे मिळालेल्या माहितीनुसार भूकंपामुळे २२ लोकांचा मृत्यू झाला तर ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ७० नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. बचाव कार्य करणारे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत. सध्या इजमीरमध्ये 38 रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि 35 बचाव दल कार्यरत आहेत. तसेच 12 इमारतींमध्ये बचावकार्य सुरू आहे.
ग्रीसमधील सामोस मध्ये सुद्धा भुकंपामुळे नुकसान झाले आहे. ग्रीसच्या सामोसमध्ये 4 लोक जखमी झाले असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.