Mon. Jan 17th, 2022

आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय? तर पुढील टीप्स जरूर वाचा

गणेशोत्सव म्हंटल की मोदक हे आलेचं बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मोदक बनवतात पण बऱ्याच गृहीणी ‘उकडीचे मोदक’ करायला घाबरतात.

आपल्याला जमेल की नाही असे त्यांना वाटत असते. मात्र योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे खुपचं सोपे होईल.

काय आहेत या सोप्या टिप्स?

 • मोदकासाठी पीठ तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती, आंबेमोहोर आणि तोही नवा घ्यावा, फार जुना नसावा.
 • त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला पाती पाडणे सोपे जाते.
 • तसेच मोदकाला चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पीठ मिळते, मात्र ते पीठ खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावे.
 • तांदुळ दळून पीठी करणार असाल तर तांदुळ आधी निवडून स्वच्छ धुवावा व पाणी निथळून नंतर सुती कपड्यावर पसरून आठ – दहा तास
 • सावलीतच सुकवावा व नंतर दळून आणावा. दळून आणल्यावर पीठी बारीक चाळणीने चाळून त्यानंतर उकडीसाठी वापरावी.
 • सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.
 • त्यामुळे मोदक खाताना पीठ तोंडात टाळ्याला चिकटते.
 • आतल्या सारणासाठी नारळ फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये, त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.
 • नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा, म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो.
 • तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.
 • सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा, खारट असु नये
 • सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे, शिजवताना खबरदारी घ्या, तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.
 • सारण आदल्या दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
 • मोदक तयार करताना उकड गरम असावी त्यामुळे छान आकार देता येतो आणि मोदक फाटत नाहीत.
 • यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.
 • उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही चविष्ट लागतात, मात्र यासाठी घरगुती पांढरे लोणी वापरा.
 • शक्य असेल तर उकड दूधामधे किंवा अर्धे दूध व अर्धे पाणी वापरा उकड पांढरी, मऊ होते व मोदक अधिक स्वादिष्ट होतात.
 • मोदक तयार करताना त्याच्या कळ्या पाडण्याचे काम कौशल्याचे आहे.
 • त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.
 • पात छान धारदार पाडता येतात. जर हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.
 • उकड मळताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करावा, तेलामुळे मोदक फुटतात.
 • पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. त्यामुळे पारी खालून फाटत नाहीत.
 • मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे,करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घ्यावा अथवा मलमलचे स्वच्छ ओले
 • कापडसुध्दा चालते, काहीच नसेल तर चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्या.
 • मोदक उकडायला ठेवताना प्रथम पाण्यात बुडवून काढा व ठेवा, त्यामुळे मोदक वाफताना तडकून फुटत नाहीत.
 • मोदक तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत.
 • त्यामुळे मोदक खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतक्या मेहनतीने बनवलेले मोदक आपल्या लाडक्या बाप्पाला का नाही आवडणार? नक्कीच आवडतील आणि तुम्हालाही हे चविष्ठ मोदक आवडतीलचं… तर आमच्या या सोप्या टिप्ससह तुम्हीही यावर्षी मोदक बनवाचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *