Sun. Aug 25th, 2019

पावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान !

0Shares

आहारात मासे खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांच्यात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. परंतु, हेच मासे पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरतात.

पावसाळ्यात मासे खाऊ नयेत कारण –

पावसाळ्यात मासे खाणे शरीरास हानिकारक असतात.

पावसाळा हा मासे आणि अन्य समुद्री जीवांचा प्रजननाचा काळ असतो.

या काळात माश्यांच्या पोटात अंडी असतात.

अशावेळी पोटात अंडी असलेले मासे खाण्यात आले तर पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.

पावसाळ्यात जलप्रदूषणाची संभावना असते, त्यामुळे माशांवर घाण जमा होते.

माश्यांवरचा हा थर धुवून देखील जात नाही. अशातच मासे खाल्ल्याने टायफाईड, कावीळ आणि डायरिया यांसारखे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.

पावसाळ्यात मच्छीमारी बंद असते, त्यामुळे बाजारात मासे मिळणं कठीण असतं.

त्यामुळे, स्टोअर किंवा पॅक केलेले मासे उपलब्ध असतात.

बरेच दिवस स्टोअर केलेले मासे खराब होण्याची शक्यता असते.

हे मासे खाल्यास इन्फेक्शनचा धोका संभवतो.

म्हणून बऱ्याचदा डॉक्टरदेखील पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला देतात.

पावसाळ्यात मासे न खाणेच योग्य ठरेल अन्यथा जीभेची चव आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *